उत्तम मराठी लेखकांच्या मूळ कृती, आणि जर्मन, जपानी, रशियन, फारसी, सर्बियन, स्पॅनिश साहित्याची निवडक भाषांतरं, मुख्यत: मूळ भाषेतून थेट.
थोरोच्या 'वॉल्डन'पासून प्रेरणा घेऊन सुरू झालेलं हे प्रकाशन मुख्यत: जागतिक साहित्यातील भाषांतरित पुस्तकांना वाहिलेलं आहे. जगभरच्या विविध भाषांमधील साहित्याबरोबरच वॉल्डनकडून मूळ मराठी पुस्तकंदेखील प्रकाशित होतात. अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे प्रकाशन आज हजारो वाचकांच्या विश्वासावर यशस्वी वाटचाल करत आहे. आमच्या निवडक भाषांतरांना आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
संस्थापक : अभिषेक धनगर, पुणे